डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
मामा म्हणजे आई-वडिलांच्यानंतर येणारे पहिले जवळचे नाते. जो भाचे मंडळींच्या मागे कायम खंबीर उभा असतो. लग्नात भाच्याच्या मागे आणि भाचीला लग्न मंडपात तोच आणतो. म्हणूनच आई-वडिलांपेक्षा त्यांना अधिक मान असतो. मात्र डोंबिवलीत एका नराधम सख्या मामानेच आपल्या ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचबरोबर घृणास्पद प्रकार म्हणजे मुलीच्या पित्यानेही तिचे लैंगिक शोषण केले आहेत. त्यामुळे याप्रकरणी डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात मामा विरोधात अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास नराधम मामाला बेड्या ठोकल्या आहे. विक्रम (वय ३०) पुर्ण नाव समजू शकलेले नाही) असे अटक केलेल्या नराधम मामाचे नाव आहे.
अधिक वाचा : LIVE : ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमध्ये बहुमताची आघाडी! पण स्वत: नंदीग्राममधून पिछाडीवर
डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेकडे जवळच असलेल्या एका गावात पीडित चिमुकली आणि कुटुंबासह राहते. तिच्याच शेजारी नराधम मामा राहतो. दोन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास या वासनांध मामाची वाईट नजर घराबाहेर खेळत असलेल्या भाचीवर पडली. यावेळी या नराधमाने तिला सांगितले की, तुला झोप येत नाही का? चल माझ्या घरात तुला झोपायचे कसे हे दाखवतो? असे म्हणत नराधम मामा तिला आपल्या घरात घेऊन गेला. त्यांनतर तिच्यावर अत्याचार केला. या नराधमाने दोन दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने तिला त्रास असह्य झाला. त्यामुळे आईने पीडितेकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. हे ऐकताच आईला धक्काच बसला. त्यांनतर आईने पीडितेला घेऊन पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रसंगाचे कथन केले आणि तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी नराधम मामा विरोधात विविध कलमांसह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी नराधमाला शनिवारी पहाटेच्या ३ च्या सुमारास सापळा रचून बेड्या ठोकल्या.
अधिक वाचा : तामिळनाडूत डीएमके आणि काँग्रेसचा पुन्हा प्रवेश
बापाकडूनही लैंगिक छळ
दरम्यान, लिंगपिसाट मामाने भाचीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पीडितेवर सख्या बापाकडूनही लैगिंक छळ झाल्याचे समोर आले. यामुळे टिळकनगर पोलिसांनी नराधम बापावरही पोक्सो कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. या घृणास्पद घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संपतापाची लाट उसळली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एन. कौराती करत आहेत.