सातारा : पुढारी ऑनलाईन
अवघ्या चार महिन्यांपूर्वी खासदार झालेल्या साताऱ्याच्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे विधानसभेच्या रणसंग्रामासह सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान झाले.
उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील विरोधात आहेत. उदयनराजे यांच्या प्रवेशानंतर भारतीय जनता पक्षाने यांच्या प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पीएम मोदी यांचीही सभा झाली. दरम्यान साताऱ्यातून उदयनराजे ३२ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. श्रीनिवास पाटील हजार मतांनी आघाडीवर आहेत.
त्यामुळे हा लीड तुटणार का?अशीच चर्चा साताऱ्यात रंगली आहे. उदयनराजेंना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी तसेच त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी प्रचंड ताकद पणाला लावली आहे. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीनेही उदयनराजेंना तगडे आव्हान दिले. शरद पवार यांना मिळालेला प्रतिसाद हा भाजपला धडकी भरवणारा होता.