पैशाची काम अडली, की राजीनाम्याच्या धमक्या आल्या: राज ठाकरे

Published on
Updated on

दहीसर : पुढारी ऑनलाईन

हीच ती वेळ आणि खिशातील राजीनामे या दोन मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवरून बोचरी टीका केली.  पैशाची कामे अडली शिवसेनेकडून राजीनाम्याची धमकी येत होती, तुमच्यासाठी नाही (सामान्य जनता) अशा शब्दात त्यांनी  शिवसेनेवर हल्ला चढवला. न्यायासाठी लोक मनसेकडे येतात असे राज म्हणाले. 

राज यांची आज दहीसरमध्ये सभा सुरू आहे. या सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. शिवसेना-भाजपच्या जाहिराती पहा, सगळीकडे लिहिलंय 'हीच ती वेळ' म्हणजे गेली ५ वर्ष नव्हता का ह्यांना वेळ? ह्या नेत्यांच्या आर्थिक हितसंबंधांसाठी फक्त राजीनाम्याच्या धमक्या दिल्या गेल्या.

राज ठाकरे म्हणाले, 

गुजरातमध्ये जेव्हा भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी अल्पेश ठाकोरांनी बिहारी माणसांच्या विरोधात हिंसक आंदोलन केलं आणि २० हजार बिहारी माणसांना गुजरात बाहेर हाकललं, का नाही अल्पेश ठाकोरांवर केसेस दाखल झाल्या? त्यांना का नाही व्हिलन ठरवलं गेलं? आणि तेच अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यामुळे मराठी चित्रपटांना प्राईम टाइम मिळू लागला, रेल्वे भरतीच्या आंदोलनामुळे मराठी तरुण तरुणींना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या. ह्या रेल्वे आंदोलनाच्या वेळेस माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर केसेस टाकल्या. 

मी आंदोलनं अर्धवट सोडली म्हणता? मला सांगा कोणतं आंदोलन अर्धवट सोडलं? महाराष्ट्राला लुटणाऱ्या टोल नाक्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं म्हणून महाराष्ट्रातले ७८ टोल नाके बंद झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात उभारणार होते त्यासाठी काय तर जलपूजन करून परत आले? काय झालं स्मारकाचं पुढे? का नाही उभं केलं? मी नेहमी सांगत आलोय पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले गड किल्ले आहेत ते आधी नीट राखा. 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कशासाठी? कोणाला हवी आहे बुलेट ट्रेन? एक लाख दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज काढून ही ट्रेन उभी करणार काय साध्य होणार?

आरेतलं जंगल रातोरात तोडलं, लोकांनी आक्रोश केला पण ह्यावर उद्धव ठाकरे झाडं तोडल्यावर म्हणतात की सत्तेत आल्यावर आरे जंगल म्हणून घोषित करू; आता काय तिकडे गवत लावणार? काहीही बोलतात. 

नाशिकमधल्या रस्त्यांवर खड्डे पडले नाहीत कारण कंत्राटदारांना आपण सांगितलं होतं की रस्त्यावर खड्डे पडले तर त्या खड्ड्यात उभं करू,शहराचा पाण्याचा प्रश्न आपण मुकणे धरणातून थेट पाईपलाईन आणून सोडवला, घनकचऱ्याचा प्रश्न सोडवला. तरीही लोकं कामांवर मतदान करत नाहीत भावनिक मुद्द्यांवर करतात. 

काश्मीरमधलं ३७० कलम हटवलं ह्यावर भाजप महाराष्ट्रात मतदान मागत आहेत; कलम ३७० काढलंत, तुमचं अभिनंदन, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोला.. भाजपला माहित आहे की भावनिक मुद्द्यांवर मतदान लोकं मतदान करणार, बाकी त्यांना खड्ड्यात ठेवा, त्यांच्या नोकऱ्या गेल्या तरी लोकांना फरक पडत नाहीत. 

आज जी मुलं-मुली कॉलेजला आहेत त्यांना पुढे शिक्षण झाल्यावर नोकऱ्या मिळण्याची शाश्वती नाही. यासाठी तुम्ही मतदान करता असल्या नालायक लोकांना ? 

रिझर्व्ह बँकेकडून सरकार पैसे काढून घेऊ शकतो, पण लोकं त्यांच्या हक्काच्या ठेवी बँकेतून काढून घेऊ शकत नाहीत. हा काय प्रकार आहे? लोकांकडे शिक्षणाला, त्यांच्या मुलांच्या लग्नाला, आजारपणाला पैसे नाहीत. असल्या गोष्टींसाठी सरकार यांच्या हातात द्यायची? 

२०१४ च्या जाहीरनाम्यात सांगतात की, सहकाराला बळकट करण्यासाठी आणि ह्या व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी विशेष कायदा आणू असं भाजप म्हणाले. आणि जी पीएमसी बँक बुडली त्यावर भाजपचे नेते आहेत आणि सिटी कॉऑप बँकेवर शिवसेनेचे नेते. आणि हे गप्पा मारतात भ्रष्टाचार दूर करण्याच्या. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे दाद मागितली, तर न्याय मिळतोच म्हणून लोकं आमच्याकडे कुठलाही नागरी प्रश्न अडला तर येतात. आणि आम्ही आंदोलनं करतो आणि न्याय मिळवून देतो.

शिवसेना-भाजपच्या जाहिराती पहा, सगळीकडे लिहिलंय 'हीच ती वेळ' म्हणजे गेली ५ वर्ष नव्हता का ह्यांना वेळ? ह्या नेत्यांच्या आर्थिक हितसंबंधांची फक्त राजीनाम्याच्या धमक्या दिल्या गेल्या. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news