महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. आज (दि. ९) सायंकाळच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर नागलवाडी ते विसावा या परिसरात महामार्गाच्या कामदरम्यान जवळपास पाच किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती.
विसावा ते नडगाव दरम्यान डोंगर काढण्यात आल्याने त्या डोंगर वर असणारी झाडे मातीच्या ढिगाऱ्या सह खाली आली होती. या झाडा मुले रस्त्यालगत बसविण्यात आलेले महावितरण चे पोल बसविण्यात आले त्या पैकी 2 पोल तारा सह कोसले होती. मोठी दुर्घटना टळली असली तरी महावितरण सह महामार्ग विभागाचा गलथान व ढिसाळ कारभार समोर आला आहे.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना या ठिकाणी घडलेल्या घटनेची माहिती मिळताच त्यांनी महावितरण विभागाला तत्काळ सूचना दिल्या मात्र महावितरण तर्फे फक्त या ठिकाणचे पोल बाजूला करण्यात आले तारा जशाच्या तशा ठेवण्यात आल्या असल्याने महावितरण विभागाचा मुजोर कारभार पुन्हा समोर आला आहे.
हे काम करताना दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती जवळपास पाच किमी पर्यत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग विभाग सह महावितरण च्या गलथान कारभाराचा नाहक त्रास प्रवासी वर्ग सह कामगार वर्गाला झाला आहे.