लॉकडाऊन काळात प्रवास करायचाय? मग, असा काढा ई-पास!

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क  

राज्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. या काळात तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास लागणार आहे. आणि ई-पास कसा मिळवायचा, यासाठी ही पुढील माहिती वाचा. या खास गोष्टी तुमच्यासाठी…

रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संचारबंदी आणि जमावबंदी लागू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील लोकांनाचं बाहेर पडता येत आहे. आता तुम्हाला आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पासची पुन्हा तरतूद करण्यात आली आहे. प्रवासासाठी तुम्हाला ई-पास काढणं बंधनकारक असणार आहे. ई-पास कसा काढायचा हे जाणून घ्या. 

ई-पास कसा काढायचा? या टिप्स तुमच्यासाठी-  

– सर्वप्रथम ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या.

– आधी सर्व सूचना वाचून घ्या. 

– apply for pass here यावर क्लिक करा 

– ज्या जिल्ह्यात प्रवास करायचाय तो जिल्हा निवडा. 

– जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा, संपूर्ण नाव, प्रवास कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत करणार, मोबाईल नंबर नोंदवा.

– प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश नोंद करा.

– वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा.

 – प्रवासाला सुरुवात कोठून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नोदवा. 

– आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? उत्तर द्या. 

– परतीचा प्रवास याच मार्गानं करणार, उत्तर द्या.

– २०० केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा

– आवश्यक ती कागदपत्रे निवडा. 

– अर्ज सादर करा. (submit)

-अर्ज केल्यानंतर एक टोकण आयडी तुम्हाला देण्यात येईल. 

– पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही टोकण आयडी क्र. नोंदवून ई-पास डाऊनलोड करू घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या. 

– ई-पासची मूळ कॉपी आणि झेरॉक्सही स्वत:कडे ठेवा.  

ई-पास कशासाठी मिळेल ? 

१) कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह ई-पाससाठी अर्ज करू शकतो. 

२) विवाहसोहळा, अत्यावश्यक आरोग्य इर्मजन्सी, अंत्यविधीसाठी ई-पास मिळतो. 

३) अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना आंतर जिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी ई-पास आवश्यक नाही. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news