महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून म्युकर मायकोसिसवर मोफत उपचार होणार : राजेश टोपे

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यातील जनतेचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळत नाही. लसीकरणाबाबतच्या सर्व गोष्टींवर केंद्राचे नियंत्रण आहे. त्यामुळे टेंडरच्या अटी सौम्य केल्या आहेत. २५ तारखेपर्यंत टेंडर भरण्याची सरकारने मुभा दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली.

वाचा : मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? 

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, 'लशींसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरसाठी एकाही कंपनीचा प्रतिसाद नाही. सध्या केवळ ५ लाख लसी उपलब्ध आहेत. राज्यात २ कोटी दोन लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या पाच कोटींचे टेंडर काढले असून अटीही सौम्य केल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. राज्याला सध्या पाच कोटी लशींची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत.' 

वाचा : ठाकरे सरकारकडून पदोन्नती आरक्षण रद्दच्या निर्णयाला स्थगिती!

म्युकर मायकोसिस या आजाराबाबत बोलताता टोपे म्हणाले, 'सध्या या आजाराचे राज्यात ८५० रुग्ण आहेत. म्युकरमायकोसिसवरील इन्फोटेरिसीन बी इंजेक्शन गरजेचे आहे.  १ लाख ९० हजार इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. आम्ही  केंद्र सरकारशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. राज्यात सध्या म्युकर मायकोसिसचे ५०० रुग्ण बरे झाले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकर मायकोसीसवर उपचार होणार आहेत. तीन लाखांपर्यंत उपचार मोफत होणार आहेत.' 

वाचा : मराठा आरक्षणावर मार्ग निघत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही; छत्रपती संभाजी राजेंचा इशारा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news