मुंबईः पुढारी ऑनलाईन
सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर हिच्या नावे खोटे ट्विटर खाते काढून शरद पवारांच्या विरोधात आक्षेपाहार्य ट्विट करणाऱ्या व्यक्तिला अंधेरीतून अटक करण्यात आली आहे. नितीन शिसोदे असे त्याचे नाव असून तो सॉप्टवेअर इंजिनियर आहे.
काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील एका तरूणाने साराला कॉल करत त्रास दिला होता. ही घटना ताजी असतानाच आता तिच्या नावे खोटे ट्विटर खाते काढून थेट शरद पवार यांच्याविषयीच आक्षेपाहार्य कमेंट करण्यात आल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांच्या ट्विटवर हँडेलवर आय लव्ह पाकिस्तान, आय सपोर्ट तुर्की असे भलेतेच मॅसेज दिसत होते. त्यांचे खातेही हॅक करण्यात आले होते, राम माधव यांचे ट्विटर अकाऊंट तुर्किश आर्मी ग्रुपने हॅक केले असल्याची माहिती पुढे आली होती.
जेष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि पत्रकार स्वप्नदास गुप्ता यांचे ट्विटर अकांऊट देखील हॅक झाले होते. गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच जणांची ट्विटर खाती हॅक केल्याची प्रकरणे समोर येत आहेत.