ऑल इज वेल | पुढारी

Published on
Updated on

ऑल इज वेल.. अमीर खान आणि त्याचे तीन मित्र..परीक्षा..थ्री इडीयटस चित्रपटातील हा सारा फिल्मी किस्सा असला तरी सद्यस्थितीत सर्व परीक्षार्थी मात्र प्रत्यक्ष अनुभवणार आहेत.  सध्या परीक्षांचा हंगाम सुरु झाला असल्याने तरुणाई अभ्यासामध्ये दंग आहे. वर्षभर चकाट्या पिटणारे बहादरही आता चक्क पुस्तक आणि नोटस्मध्ये डोकं खुपसून बसलेले दिसत आहेत. काही जणांची असाईनमेंट कप्‍लीटेशन सुरु आहे. सबमिशनची तारीख जवळ येत आहे तशी दांडी बहदरांची नोटस आणि असाइनमेंटसाठी जुळवाजळव सुरु आहे. 

बोर्ड परीक्षा देणार्‍या दहावी  व बारावीच्या विद्यार्थी मित्रांची तर पुरती भंबेरी उडाली आहे.या विद्यार्थ्यांना पालक व शिक्षकांच्या अपेक्षा पेलत करिअरला दिशा देणार्‍या परीक्षांना सामोरे जावे लागते. भविष्यात काय करायचे?, कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा? करिअरचा कोणता मार्ग निवडायचा? यासारख्या अनेक अपेक्षा व जबाबदारींची जाणीव ठेवून तरुणाई परीक्षेला सामोरी जात आहे. 

अभ्यासू व्यक्तीमत्व देखील परीक्षा जवळ आल्याने गोंधळून जातात. पण मित्रांनो गोंधळून- गडबडून चालणार नाही. त्यावेळी फक्त 'ऑल इज वेल'  सगळ ठीक होईल.. शांतचित्ताने आलेला पेपर वाचा, आणि अभ्यासलेले आठवून लिहा. कितीही अवघड प्रश्‍न असले तरी आपण वर्षभर अभ्यासलेल्या अभ्यासक्रमावरच ते असणार आहेत. तेव्हा टेंशन कायको लेने का? परीक्षेचा बाऊ करुन टेंशन घ्यायचे नाही. गोंधळल्याने आयत्यावेळी वाचलेलं काहीच आठवत नाही. ब्लँक व्हायला होतं. म्हणून ऑल इज वेल. शांत आणि संयमासाठी तरुणाईसाठी ऑल इज वेल हे ब्रीदवाक्य ठरणार आहे. शांत चित्ताने परीक्षेला सामोरे जा. स्वत:कडून नेहमी बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. झालेल्या पेपर पेक्षा उद्या येणार्‍या पेपरचा अभ्यास करा. 

ऑल द बेस्ट.

– मीना शिंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news