धोकादायक ; ‘किकी’ चा बाप ‘ड्रॅगन ब्रीथ’ चॅलेंज

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सोशल मीडियावरून कोणी कधी कोणते चॅलेंज देईल याचा काही नेम नाही आणि ते स्वीकारण्याची संख्या काही कमी नाही. कारण  सोशल मीडियावर  सध्‍या ट्रेंड आहे तो चॅलेजचा. आपण किती धाडसी आहोत हे दाखवण्यासाठी अनेक लोक ट्रेंडमध्ये असणाऱ्या चॅलेजचा स्विकार करत आहेत.  किकी चॅलेंजमुळे अनेकाचे अपघात झाले आहेत.  पोलिसांनी सावधानतेचा इशारा देत हे चॅलेंज कोणी स्‍वीकारलेले पाहायला मिळाले तर त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई अथवा अटक केले जाईल असा इशारा दिला आहे.  मात्र असं असतानाही सोशल मीडियावर एक नवीन धोकादायक चॅलेंज व्‍हायरल होत आहे. या चॅलेंजचे नाव 'ड्रॅगन ब्रीथ' आहे. 

काय आहे 'ड्रॅगन ब्रीथ' चॅलेंज?

'ड्रॅगन ब्रीथ' चॅलेंज मध्‍ये लिक्‍विड नायट्रोजनमध्‍ये बुडवलेली कांडी तोंडाच्‍या आतमध्‍ये ठेवली जाते. ही कांडी तोंडाच्‍या आतमध्‍ये ठेवल्‍यानंतर तोंडातून ड्रॅगनसारखा धूर निघतो. 

 किकी चॅलेंज पडतय महागात,पोलिसांचा इशारा…

सोशल मीडियाला  चॅलेंजच्‍या भूताने झपाटल्‍यामुळे जो तो 'किकी' नंतर 'ड्रॅगन ब्रीथ' चॅलेंजचा म्‍हणजे नायट्रोजनमध्‍ये बुडवलेल्‍या कांडी खाताना व्‍हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत आहेत. हा चॅलेंज फक्‍त मोठ्‍यापर्यंत मर्यादित न राहता, लहान मुलेपण करतान दिसत आहेत. मात्र हे चॅलेंज शरीरासाठी धोकादायक, जीवघेणा असतानाही लोक करण्‍याचा प्रयत्‍न करताना दिसत आहेत. 

एका आरोग्‍य संघटनेकडून याबद्‍दल एक निवेदन जाहीर करण्‍यात आले आहे. त्‍यांनी या चॅलेंजबद्‍दल लोकांना इशारा दिला आहे की, लिक्विड नायट्रोजन तोंड, अन्‍ननलीका, पोट याला नुकसान पोहचवू शकते. तरीही लोक एका चॅलेंजसाठी जीव धोक्‍यात घालत आहे. 

'ड्रॅगन ब्रीथ' चॅलेंजमुळे लोकांच्‍या आरोग्‍याला नुकसान पोहचत आहेत. या चॅलेंजमुळे फ्‍लोरिडामध्‍ये एका तरुणाला हॉस्‍पिटलमध्‍ये भर्ती करण्‍यात आले. यानंतर त्‍या तरुणाच्‍या आईनी फेसबुकवर एक पोस्‍टच्‍या माध्‍यामातून ड्रॅगन चॅलेंज न करण्‍याचा सल्‍ला दिला आहे. 

नायट्रोजनच्‍या कांडीचे तापमान १९६ ते ३२० डिग्री एवढे असते. याच्‍यामुळे एखा्‍दयाचा जीव जाउ शकतो. त्‍यामुळे असे धोकादायक चॅलेंज करण्‍यापासून लांबच राहणे चांगले. 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news