धुळे शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील तसेच धुळे पंचायत समितीचे शिवसेनेचे माजी सभापती कैलास पाटील यांच्यासह असंख्य कार्यकत्यांनी आज मुंबईमध्ये काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. माजी आमदार पाटील यांची काँग्रेसमधे घरवापसी होत असली तरी शिवसेनेला धुळे जिल्ह्यात मोठा फटका असल्याचे मानले जाते आहे.

अधिक वाचा : 'पदोन्नतीतील आरक्षणप्रश्‍नी सरकारमधील संवाद तुटल्‍यासारखा' 

धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनीही माजी मंत्री रोहिदास पाटील, कुणाल पाटील यांच्याशी विचारविनिमय करुन पुन्हा काँग्रेस पक्षात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला. युवक बिरादरी चळवळीतून काँग्रेस पक्षात सक्रीय झालेल्या पाटील यांनी २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. ते आता पुन्हा स्वगृही आल्याने आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षात सक्रीय होण्याचा संकल्प केला आहे. यामुळे धुळे शहर आणि जिल्हयात काँग्रेस पक्षाचे संघटन वाढण्यास मदत होणार आहे. 

अधिक वाचा : मोठी घोषणा! पहिल्या टप्‍प्‍यात १८ जिल्‍हे होणार अनलॉक, बारावीची परीक्षाही रद्‍द 

आज गांधी भवन मुंबई येथे माजी आ.शरद पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शिरपुर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व्ही.यु.पाटील, धुळे पं.स.चे माजी सभापती कैलास पाटील, प्रा.जसपालसिंह सिसोदिया, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री  रोहिदास पाटील, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,आदिवासी मंत्री के.सी.पाडवी, कॉग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, हुसैन दलवाई, नसिम खान, माजी खा.बापू चौरे, माजी आ. डी.एस. अहिरे, धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर, काँग्रेस धुळे शहराध्यक्ष युवराज करनकाळ,नाशिक काँग्रेस अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, धुळे तालुका कॉग्रेस अध्यक्ष भगवान पाटील, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news