

पिंपरी : देहूरोड :
देहू नगरपंचायतीची निवडणूक तब्बल दहा महिन्यानंतर जाहीर करण्यात आली आहे. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 22 डिसेंबरला मतमोजणी होईल.
10 फेब्रुवारी रोजी मुदत संपल्याने ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली होती. 8 डिसेंबर 2021 रोजी नगरपंचायत अस्तित्वात आली; पण वारंवार निवडणूक लांबणीवर पडली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून निवडणूक आयोगाने यासंदर्भात पत्र दिले आहे.
निवडणुकीकडे डोळे लावून बसलेल्यांची मात्र चांगलीच धावपळ होणार आहे. निवडणुकीसाठी 2011 ची जनगणना कायम धरली आहे. त्यानुसार गावात 17 हजार 158 मतदार असून त्यापैकी 9240 पुरुष आणि 8 हजार 717 महिला आहेत.