Crime News : एक्स बॉयफ्रेंडने पेटवलेल्या युवतीचा मृत्यू, दुमका शहरात अवघ्या दीड महिन्यातील दुसरी घटना

Crime News : एक्स बॉयफ्रेंडने पेटवलेल्या युवतीचा मृत्यू, दुमका शहरात अवघ्या दीड महिन्यातील दुसरी घटना
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Crime News झारखंडातील दुमका येथे एक्स बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिला म्हणून पेटवलेल्या तरुणीचा आज मृत्यू झाला. ही घटना काल शुक्रवारी (दि.7) दुमका येथे घडली होती. विशेष म्हणजे दुमका शहरातील ही अवघ्या दीड महिन्यातील दुसरी घटना आहे. दीड महिन्यापूर्वी अशाच प्रकारे प्रेमाच्या मागणीला नकार दिल्याने एका किशोरवयीन मुलीला पेटवण्यात आले होते. यामुळे शहरात प्रचंड खळबळ माजली आहे.

मारुती कुमारी (22) हिचा शुक्रवारी रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये भाजल्याने मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी आरोपी राजेश राऊत (वय 23) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवती मारुती कुमारीने मृत्यूपूर्वी पोलिसांनकडे जबाब नोंदवला होता. फुलो झानो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील दंडाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पोलिसांना सांगितले की, राजेश याने आपला लग्नाचा प्रस्ताव मान्य न केल्यास अंकिताकुमारीप्रमाणेच जाळून मारण्याची धमकी दिली होती. शुक्रवारी सायंकाळी ती झोपलेली असताना आरोपी राजेश याने तिच्या खोलीत घुसून अंगावर पेट्रोल टाकले आणि माचीसने तिला जाळले. आणि तो पळून गेला. मी राजेशला ओळखू शकते, असे तिने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

झानो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्राथमिक उपचारानंतर तिला राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र घटनेत गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला.

मयत युवती ही लहानपणापासूनच जरमुंडी पोलीस ठाण्यांतर्गत भरतपूर गावात आजी-आजोबांसोबत राहायची. भरतपूर गावातील अल्पभूधारक कुटुंबातील आहे. दरम्यान, मूलीच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर, "माझ्या मुलीला न्याय मिळावा यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी माझी मागणी आहे," असे पीडितेची आई मंजू देवी यांनी पत्रकारांना सांगितले.

Crime News दरम्यान मृत्यूपूर्वी तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला रिम्समध्ये नेण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने पीडितेच्या कुटुंबाला उपचारासाठी एक लाख रुपये दिले. "आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे," असे जारमंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक-कम-अधिकारी यांनी सांगितले.

दुमका शहरात अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत दोन एकसारख्या घडलेल्या घटनांनी शहर हादरले असून शहरात संतापाची लाट उसळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news