नाशिक : पुढारी ऑनलाईन
कोरोनाच्या संकटात मदतीसाठी संस्थांनी पुढं आलं पाहिजे. निवृत्त सैनिक, तरुण, तंत्रकुशल युवकांनी पुढे येण्याचे आवाहन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
वाचा: कोरोनाची लाट तरुण, लहान मुलांसाठी घातक
यावेळी भुजबळ म्हणाले, गरज नसतानाही अनेक जण रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगेत उभे असतात. रेमडेसिवीरचा गैरवापर टाळण्यासाठी डॉक्टरांचा प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे. राज्यात या इंजेक्शनचा तुटवडा आहे. इंजेक्शनसाठी नाशिककरदेखील संतप्त झाले आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.