मेढा (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
निखिल नामदेव केसकर ह्या १५ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याचा वेण्णा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे.
वाचा : मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरूच
केसकरवाडी (ता. जावली) येथील निखिल हा आपल्या ७ ते ८ सवंगड्यासह कण्हेर जलाशयातील वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा छोटा डोह पाहून तो पोहण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याला पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज त्याला न आल्याने आणि गाळात रुतत गेल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. तो पाण्यातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करीत होता. परंतु त्याला बाहेर पडता आले नाही. अखेर १५ मिनिटांनी गावातील ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढले व मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वाचा : लसटंचाई आणखी दोन महिने
ही बातमी गावात कळल्यावर गावात एकच खळबळ उडाली. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आज गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर लाडका एकुलता एक मुलगा गेल्याने निखिलच्या आई- वडिलांनी हबंरडाच फोडला.
इयत्ता ९ वीमध्ये शिकत असणारा निखिल हा वेण्णा नदीकाठी असणाऱ्या मेरूलिंग विद्या मंदिरात शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान बहिण असा परिवार आहे.