बेळगाव : ऑक्‍सिजन सिलिंडरच्या ट्रकचा अपघात 

Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा 

बळ्ळारीहून बेळगावला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन येत असलेल्या ट्रकला मुत्नाळ (ता. बेळगाव) येथे अपघात झाला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. ट्रकमधील ऑक्सिजन सिलिंडरला कोणताच धक्का न लागल्याने सर्व सिलिंडर सुरक्षित राहिले व पुढील अनर्थ टळला. 

अधिक वाचा : तामिळनाडूत सहाव्यांदा द्रमुकची सत्ता; मुख्यमंत्रीपदी एम. के. स्टॅलिन यांनी घेतली शपथ

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगावात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे एक ट्रक बळ्ळारीहून बेळगावकडे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन येत होता. मुत्नाळ जवळ समोरील वाहनाला या ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या टँकरला चुकवण्याच्या नादात दोन्ही वाहनांची धडक झाली. यामध्ये सिलिंडर भरलेल्या ट्रकचे पुढील टायर फुटले. परंतु, काही अंतरावर जाऊन ट्रक तसाच थांबला. त्यामुळे वाहनात भरलेल्या सिलिंडरला कोणताही धक्का लागला नाही. ही माहिती बागेवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news