बदलापूर; पुढारी प्रतिनिधी : बदलापूर पश्चिमेकडील मानव पार्क सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेची परवानगी न घेता झाड तोडणे सुरु केले. दरम्यान, रस्त्यावरून दुचाकीवरून चाललेल्या दोघा जणच्या अंगावर हे तोडलेले झाड पडले. दुचाकी चालवणाऱ्या इसमाच्या डोक्यात झाड पडल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे.
राज्यात उद्या भाजप आणि काँग्रेस आमनेसामने! मोदी सरकारविरोधात काँग्रेसचेही राज्यव्यापी आंदोलन
या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात मोहमद मिया हजाम वय ३५, राहणार मुस्लिम मोहल्ला, बदलापूर गांव यांच्या तक्रारीवरून लकुम अर्जुन रा.मानवपार्क चर्चरोड रमेशवाडी, संतोष नाईक रा. कान्होर रोड बदलापूर गांव व सोसायटीतील ईतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी या प्रकरणात गंभीर जखमी झालेली नाही.
मुंबईत बोगस लस देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितला घटनाक्रम!
गाडी वरून जात असताना झाड डोक्यावर पडल्याने रशिद मुल्ला,रा. बदलापूर गांव यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बदलापुर गावाकडून बेलवली कडे कामानिमित्त जात असताना मानवपार्क सोसायटीतील हे झाड तोडत होते. मात्र या वेळेस कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेता तसेच स्थानिक नगरपालिका प्रशासनाचे कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे झाड तोडून या दोघांच्या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.