मुंबई : पुढारी ऑनलाईन
वरळी नाका येथे खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवणारा प्रसंग घडला आहे. एका महिलेला रस्त्यातच प्रसूती वेदना सुरु झाल्या. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी रुग्णवाहिका येण्याची वाट न पाहता महिलेला आपल्या वाहनात घेतले. पोलिस व्हॅनमध्येच महिलेची प्रसूती झाली.
एका महिलेला रस्त्यातच प्रसूती वेदना सुरु झाल्या. ती रस्त्यावर कोसळली. लोकांनी पोलिस कंट्रोल रूमला फोन केला. पोलिसांनी क्षणाचाही विचार न करता त्या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलिस व्हॅनमध्य़े बसवले. पोलिस व्हॅनमध्येचं महिलेने बाळाला जन्म दिला. नंतर तिला आणि बाळाला रुग्णालयात नेण्यात आले.