डॉल्बीमुक्त गणराय आगमन, विसर्जन मिरवणुकीचा निर्धार | पुढारी

डॉल्बीमुक्त गणराय आगमन, विसर्जन मिरवणुकीचा निर्धार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा यंदाचा गणेशोत्सव गणराय आगमन आणि विसर्जन मिरवणूक शांततेत, पारंपरिक वातावरणात डॉल्बीमुक्त आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्याचा निर्धार राजारामपुरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकीत सोमवारी करण्यात आला.

शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या उपस्थितीत खरे मंगल कार्यालयात सायंकाळी झालेल्या बैठकीला राजारामपुरी परिसरातील तीनशेवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी नितीन धुमाळ, प्रदूषण मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील, कोल्हापूर महापालिकेचे उपअभियंता सतिश फप्पे आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत करणे गरजेचे आहे. गणेशोत्सव शांततेत साजरा करावा, गणराय स्थापनेचे ठिकाण सुरक्षित असावे, 24 तास दोन स्वयसेवक असणे बंधनकारक असावे, देखावे पाहण्यासाठी येणार्‍या महिला, तरुणींची छेडछाड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, महिला आणि पुरुष अशी वेगवेगळी रांग करावी. मूर्तीला इजा होणार नाही, याची खबरदारी घेण्याचेही यावेळी आवाहन करण्यात आले. न्यायालयीन निर्देशानुसार मंडप उभारणी करून सुचनांचे पालन करावे करण्याबाबतही उपअधीक्षक टिके यांनी आवाहन केले.

Back to top button