नाशिक : उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई, परराज्यातील साडे नऊ लाखांचा मद्यसाठा केला जप्त | पुढारी

नाशिक : उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई, परराज्यातील साडे नऊ लाखांचा मद्यसाठा केला जप्त

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभाग यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नाशिक कळवण रस्त्यावर पिंपळनारे शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली. गुजरात मधून दादरा नगर हवेली दमण राज्यातील विक्रीचा मद्यसाठा वाहतूक करताना पिकअप जप्त करत सुमारे साडे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, विभागीय उप-आयुक्त नाशिक अर्जुन ओहोळ, अधीक्षक नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून ही कारवाई केली. मद्याची अवैधरित्या वाहतुक करताना वाहनासह परराज्यातील विदेशीमद्यसाठा जप्त केला. यामध्ये वाहनासोबत असलेल्या इसम सुरेश कुमार रामलाल बिश्नोई यास अटक करण्यात आलेली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button