श्रावणमासानिमित्त सिद्धेश्‍वर मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू | पुढारी

श्रावणमासानिमित्त सिद्धेश्‍वर मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटी, श्री ब्रहन्मठ होटगी मठ संस्थान व सद्भक्‍त मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि काशी पीठाचे जगद‍्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वाजीं यांच्या सान्‍निध्यात श्री सिद्धेश्‍वर मंदिर येथे श्रावणमास निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने 29 जुलै ते 28 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रावणमास उत्सव समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात काशी पीठाचे जगद‍्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, चिटगुप्पा मठाचे मठाधिपती गुरुलिंग शिवाचार्य महास्वामी, मंद्रूप मठाचे मठाधिपती रेणुका शिवाचार्य महास्वामी, वंडागळी मठाधिपती पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, होटगी मठाचे उत्तराधिकारी चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य स्वामी उपस्थित राहणार आहे. भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button