98 हजार शेतकर्‍यांनी भरला 6 कोटी 65 लाख पीक विमा | पुढारी

98 हजार शेतकर्‍यांनी भरला 6 कोटी 65 लाख पीक विमा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सोलापूर जिल्ह्यताील सुमारे 98 हजार 298 शेतकर्‍यांनी पीक विम्यापोटी जवळपास 6 कोटी 65 लाख 46 हजार रुपयांचा पिक विमा भरला. त्यापोटी जिल्ह्यातील खरीपाचे जवळपास 82 हजार 775 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात आता पर्यंत खरीपाच्या जवळपास 85 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.काही भागात आणखी पेरण्या सुरु आहेत. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्‍यांना बसू नये तसेच त्यांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी शासनाने सुरु केलेल्या विमा योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवहान कृषि विभगाच्या वतीने करण्यात आले होते.

अनेकवेळी विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेती पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवू शकते. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणीत बिघडते तर वेळ प्रसंगी शेतकर्‍यांना आर्थिक चणचण भागविण्यासाठी खासगी सावकाराकडून पैसे घ्यावे लागतात.त्याचा परिणाम संपूर्ण कुुठुंबावर होवू नये यासाठी शासनाने आता हवामानावर आधारीत कृषि पिक विमा योजना सुरु केली आहे. त्याची मुदत येत्या 30 जुलै पर्यंत आहे. आत्ता पर्यंत जिल्ह्यात केवळ 40 ते 45 टक्के लोकांनीच पीक विमा भरला आहे. आत्तापर्यंत भरलेल्या विम्यापोटी विविध कारणामुळे नुकसान झाल्यास जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जवळपास 329 कोटी 40 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकते. मात्र ज्या शेतकर्‍यांनी वेळेत पिक विमा भरला त्यांनाच हा लाभ होऊ शकतो.त्यामुळे उर्वरित शेतकर्‍यांनीही वेळेत पीक विमा भरावा असे आवाहन जिल्हा कृषि विभागाने केले.

दोनच दिवस शिल्लक ः शिंदे
खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत अंतिम मुदत आहे. सध्या जिल्ह्यात केवळ 98 हजार शेतकर्‍यांनी खरीपासाठी विमा भरला आहे, त्यामुळे केवळ 40 ते 45 टक्के लोकांनीच विमा संरक्षण मिळविले आहे. उर्वरित शेतकर्‍यांनीही आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी दोन दिवसात पिक विमा भरावा असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी केले.

Back to top button