सोलापूर : ग्रामपंचायतीच्या 255 जागांसाठी 501 अर्ज | पुढारी

सोलापूर : ग्रामपंचायतीच्या 255 जागांसाठी 501 अर्ज

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जवळपास 25 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. 25 ग्रामपंचायतींमधील 255 जागेसाठी आजपर्यंत 501 अर्ज दाखल झाले आहेत, तर आज मंगळवार दिनांक 19 जुलै शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मंगळवारी आणखी किती अर्ज दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी 19 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 20 जुलै रोजी त्याची छाननी होणार आहे. 22 जुलै रोजी अर्ज माघार घेण्याची शेटची तारीख आहे, तर त्याचदिवशी चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत.

4 ऑगस्ट रोजी मतदान, तर 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये करमाळा तालुक्यातील 8 ग्रामपंचायती, माढा 2, बार्शी 2, मोहोळ 1, पंढरपूर 2, माळशिरस 1, मंगळवेढा 4, दक्षिण सोलापूर तालुक्यातील 2, तर अक्कलकोट तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यामध्ये 94 प्रभागात 255 जागांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 501 अर्ज दाखल झाले आहेत, तर मंगळवार अर्ज दाखल करण्याचा शेवट दिवस आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी किती अर्ज दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button