फ्लिपकार्डवर ओटीपी वापरून 69 हजारांची फसवणूक | पुढारी

फ्लिपकार्डवर ओटीपी वापरून 69 हजारांची फसवणूक

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा फ्लिपकार्ट क्रेडिट कार्डचा ओटीपी पीन वापरून अंबादास वाघमारे यांची 69 हजार 115 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अंबादास शिवराया वाघमारे (वय 37 रा. गुरूदेव दत्त नगर भाग-5, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यात म्हटले आहे की, अंबादास हे आठ वर्षांपासून अ‍ॅक्सिस बँकेचे खातेधारक आहेत. त्यांच्याकडे तीन क्रेडिट कार्ड आहेत.

30 मे 2022 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तेे घरी होते. त्यावेळी फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड वापरल्याचा ओटीपी आला नाही. पण, त्या कार्डवरून पहिल्यांदा 63 हजार 997 काढण्यात आले. नंतर 5 हजार 118 रूपये काढण्यात आले. त्यावेळी वाघमारे यांना दोन रक्कमेचा सक्सेस फुल मेसेस वाघमारे यांच्या ई-मेलवर आला. त्यानंतर वाघमारे यांनी बँकेत जावून घडलेला प्रकार सांगितला. तेंव्हा बँकेने वाघमारे यांना ऑनलाईन तक्रार दाखल करण्यास सांगितले.  1 जून रोजी वाघमारे हे बँकेत गेल्यावर कळाले की, फ्लिपकार्ट क्रेडिट कार्डमधून ओटीपी वापरून पैसे काढून आंबादास यांची फसवणूक करण्यात आली आहे. या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button