औरंगाबाद : मनपा प्रभाग रचनेचा आराखडा फुटला ; निवडणूक आयोगाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश | पुढारी

औरंगाबाद : मनपा प्रभाग रचनेचा आराखडा फुटला ; निवडणूक आयोगाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद महापालिकेचा प्रारूप आराखडा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. ही बाब अत्यंत चुकीची असून, या प्रकरणातील संबंधितांवर त्वरित गुन्हे दाखल करावेत, असा आदेश राज्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे अशी माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

प्रभाग रचनेचा आराखडा फुटल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांनी सोमवारी मुंबईत राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ‘पुढारी’ शी संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली. महापालिकेतील अधिकारी यांनी ज्या लोकांच्या मर्जीतील हा प्रारूप आराखडा तयार केला आहे. व शहरात सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आपण निवडणूक आयुक्तांकडे केली, असेही सिरसाट यांनी सांगितले.

महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध होण्याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आराखड्याच्या गोपनियतेचा भंग झाला असल्‍याचे ते म्‍हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button