राज्याचा विकासदर ७.३ टक्के, दरडोही उत्पन्नात महाराष्ट्र अव्वल | पुढारी

राज्याचा विकासदर ७.३ टक्के, दरडोही उत्पन्नात महाराष्ट्र अव्वल

मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्याचा विकासदर यावर्षी ७.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशाची अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढत असताना राज्याने ७.३ टक्के विकासदर गाठला आहे. मात्र, सन २०१६-१७ च्या तुलनेत अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. २०१६- १७ ला राज्याने दोन आकडी म्हणजे १० टक्के विकासदर गाठला होता. 

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा सन २००१७-१८ चा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत मांडला. राज्याचे सकल उत्पन्न २४ लाख ९४ हजार कोटींच्या घरात गेले आहे. 

राज्याचं दरडोई उत्पन्नात वाढ होऊन ते एक लाख ८० हजार झालं असून याबाबतीत आघाडीवर असणाऱ्या कर्नाटक राज्याला मागे टाकलं आहे. एकूण उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलं असून पूर्वीच्या २१.२% च्या तुलनेत १६.६% झाल्याची माहिती ही या अहवालात देण्यात आली आहे.

Back to top button