2 लाख 84 हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके

2 लाख 84 हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके
Published on
Updated on

माळशिरस : पुढारी वृत्तासेवा माळशिरस तालुक्यातील सर्व शाळा दि. 13 जूनपासून चालू होणार आहेत. सग्रम शिक्षा अभियानांर्तगत मोफत पुस्तक योजनेंतर्गत सन 2022 / 23 वर्षातील इयत्ता पहिली ते आठवीच्या अनुदानीत वर्गाच्या विद्यार्थांना तसेच सेमी इंग्रजी माध्यमांच्या वर्गाना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके मिळणार आहेत. एकूण 2 लाख 84 हजार 620 पुस्तकाचे वाटप तसेच 19 हजार 910 विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचे प्रत्येकी 600 रुपये प्रमाणे बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहीती पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी दिली.

यावेळी गटसमन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी पी. व्ही. करडे उपस्थित होते. गेले दोन वर्ष कोरोना काळात काही काळ वगळता शाळेच्या घंटा वाजल्या नाहीत. त्यामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही. या वर्षी तालुक्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याने विद्यार्थी सह पालक वर्गात आनंद व उत्सुकतेचे वातावरण आहे. या मोफत पुस्तके व गणवेशाचा लाभा अनुसुचित जाती अनुसुचीत जमाती व दारीद्र रेषेतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश मिळण्याचे नियोजन पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केले आहे.

माळशिरस तालुक्यात एकुण 475 प्राथमिक व माध्यमीक शाळा असुन त्यात जिल्हा परीषदेच्या 393 प्राथमिक शाळा आहेत. यात पहीले ते आठविचे 55 हजार 32 विद्यार्थी आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी पात्र विद्यार्थांना या योजनेचा लाभ मिळणार असुन कोणतीही पात्र शाळा या योजने पासुन वंचीत राहणार नाही. तसेच तालुक्यातील मुली 13 हजार 548, अनुसुचीत जाती मुले 3 हजार 51, अनुसुचीत जमाती मुले 138 ,बीपीएल मुले 3 हजार 173 अशा 19 हजार 910 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशासाठी सहाशे रुपये या प्रमाणे एकुण 1 कोटी 19 लाख 46 हजार रुपये विद्यार्थांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

इयत्ता पहीली ते आठवी च्या विद्यार्थांना मिळणारी पुस्तके पुढील प्रमाणे इयत्ता 1 ली एकुण लाभार्थी 5610, मराठी माध्यम 3575, ऊर्दु माध्यम 11, सेमी इंग्रजी माध्यम 2024 एकुण पुस्तके 20591 इयत्ता 2 री एकुण लाभार्थी 7170, मराठी माध्यम 5180, ऊर्दु माध्यम 11, सेमी इंग्रजी माध्यम 1997, एकुण पुस्तके 19572, इयत्ता 3 री एकुण लाभार्थी 7351 मराठी माध्यम, 5556 ऊर्दु माध्यम, 9 सेमी इंग्रजी माध्यम 1786, एकुण पुस्तके 26632. इयत्ता 4 थी एकुण लाभार्थी 7991 मराठी माध्यम, 6027 ऊर्दु माध्यम, 13 सेमी इंग्रजी माध्यम 1951, एकुण पुस्तके 35014. इयत्ता 5 वी एकुण लाभार्थी 9987, मराठी माध्यम 6571, ऊर्दु माध्यम 6, सेमी इंग्रजी माध्यम 3410, एकुण पुस्तके 44849. इयत्ता 6 वी एकुण लाभार्थी 10205, मराठी माध्यम 6693, ऊर्दु माध्यम 14, सेमी इंग्रजी माध्यम 3498, एकुण पुस्तके 39010. इयत्ता 7 वी एकुण लाभार्थी 10773, मराठी माध्यम 7128, ऊर्दु माध्यम 9, सेमी इंग्रजी माध्यम 3636, एकुण पुस्तके 48748. इयत्ता आठवी एकुण लाभार्थी 112 89, मराठी माध्यम 7336, ऊर्दु माध्यम 7, सेमी इंग्रजी माध्यम 3946 एकुण पुस्तके 50204 अशी एकुण 2 लाख 84 हजार 620 पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे. सदर पुस्तक वाटपाची जबाबदारी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी व प्रत्येक केंद्रावर त्या त्या केंद्र प्रमुखावर निश्चीत करण्यात आली आहे.

सर्व पात्र विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाचे वाटप पहिल्याच दिवशी करावे. कुठलीही पात्र शाळा व विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, अशा सूचना सर्व केंद प्रमुख व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
– धनंजय देशमुख
गटशिक्षण अधिकारी, माळशिरस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news