कृष्णाघाट – मिरज पुल उद्या वाहतूक  बंद

शिरटी; पुढारी वृत्तसेवा : मिरज- अर्जुनवाड- शिरोळ या मार्गावरील कृष्णा नदीवरील कृष्णाघाट-मिरज येथील पुलाच्या सुरक्षिततेसाठी बेअरिंग बदलण्याचे काम शनिवारी १० जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे १० जुलैपासून २० जुलैपर्यंत सकाळी ११ ते ११.३० या वेळेत दररोज कृष्णा घाट पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत पुलाच्या दुतर्फा बॅरिकेट्स लावून काम केले जाणार आहे.

कृष्णा नदीघाटावरील पुल हा सन १९९४ मध्ये बांधलेला असून या पुलास ३० मी. सात गाळे आहेत. गाळ्यांची एकूण लांबी २१० मी. इतकी असून पुलाच्या सुरक्षिततेसाठी त्याचे बेअरिंग बदलणे, एक्सपेंशन जॉईंट बदलणे,रेलिंग दुरुस्ती करणे आदी कामे प्रस्तावित असून यापैकी प्राधान्याने पुलाचे बेअरिंग दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. प्रतिदिन एका गळ्यातील बेअरिंग बदलण्याचे नियोजन असून त्यासाठी किमान ३० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे उद्यापासून या मार्गावरील वाहतूक ३० मिनिटे बंद राहणार आहे.   

दरम्यान या कालावधीत शिरोळ,अर्जुनवाडकडून मिरजेकडे जाणाऱ्या वाहनधारकांना जयसिंगपूर मार्गे प्रवास करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news