पिंपरी : अक्षयतृतियेनिमित्त सोने खरेदीसाठी गर्दी | पुढारी

पिंपरी : अक्षयतृतियेनिमित्त सोने खरेदीसाठी गर्दी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अक्षयतृतीया सणाची ओळख म्हणजे घरात काही नवीन असावे, नवीन खरेदी केली जावी यासाठी प्रत्येकजण बाजाराकडे धाव घेतो.

अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे नवीन वाहनांसह सोने- चांदी खरेदीसाठी ग्राहकांची सकाळपासून गर्दी झाली होती.

BCCI ने ‘या’ क्रीडा पत्रकारावर घातली दोन वर्षांची बंदी, कारण…

अक्षयतृतीयेनिमित्त शहरातील व्यवसायिकांनी आपापली दुकाने सजविल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर सराफ बाजार व वाहनांच्या शोरुममध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून महिलांनी सोने खरेदीसाठी केली. याशिवाय नवीन वाहन खरेदीसाठी वाहनांच्या शोरूम्सवर ग्राहक सकाळपासून दिसत होते. आज सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 51 हजार 400 तर चांदीचा भाव 64 हजार रुपये किलो होता.

सातारा : फरासवाडीत खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला

महिलांच्या दागिन्यामंध्ये पाटमाळ, मोहनमाळ, राणीहार, कानातले, मंगळसूत्र, गंठण, टेंपल ज्वेलरी, अ‍ॅन्टिक कलेक्शन आणि कलकत्ती वर्क यांची तर पुरूषांमध्ये अंगठी, हातातील ब्रेस्लेट, कडे, गळ्यातील साखळी यांची खरेदी झाली. असे, सत्यम ज्वेलर्सचे राहुल चोपडा यांनी सांगितले.

त्यासोबतच या दिवशी इलेक्ट्रॉॅनिक्स वस्तूंची खरेदी जोरात केली गेली. नवीन एलईडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत होता. त्यासाठी शोरूममध्ये मोठी गर्दी झाली होती.

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये मुस्लीम मावळ्यांकडून शिवरायांना अभिवादन; मशिदीत मुर्तीची प्रतिष्ठापना

शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांमध्ये एलसीडी-एलईडी, फ्रीज, ओव्हन, कॅमेरा, वॉशिंग मशीन, फर्निचर यासारख्या अन्य उपकरणांचा जोरदार खरेदी केली. वाहन खरेदीसाठी आज शहरातील शोरूम्समध्ये सकाळपासूनच गर्दी होती.

Back to top button