

बार्शी : पुढारी वृत्तसेवा येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने दरवर्षी कवी कालिदासदिनाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहास देण्यात येणार्या 'मेघदूत' पुरस्कारासाठी भाग्यश्री केसकर व प्रकाश लावंड यांची निवड झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी दिली. कोरोनामुळे दोन वषेर्र् हा कार्यक्रम झाला नाही. 2020 व 2021 या दोन वर्षार्ंतील प्रत्येकी एक, असे दोन उत्कृष्ट काव्यसंग्रह निवडण्यात आले. उस्मानाबाद येथील कवयित्री भाग्यश्री केसकर यांच्या 'उन्हानं बांधलं सावलीचं घर' (सन 2020) व करमाळा येथील कवी प्रकाश लावंड यांच्या 'काडवान'(सन 2021) या काव्यसंग्रहांची 'मेघदूत' पुरस्कारासाठी निवड झाली.
रविवार, 10 जुलैला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास यांच्या प्रमुख उपस्थितीत व जयकुमार शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली मातृ मंदिर, ढगे मळा येथे 'मेघदूत' पुरस्काराचे वितरण होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक पं.ना. कुलकर्णी व कवी प्रकाश गव्हाणे पुरस्कारांचे प्रायोजक आहेत.
कार्यक्रमासाठी कार्याध्यक्ष प्रा. अशोक वाघमारे, उपाध्यक्ष जयसिंग राजपूत, सचिव चन्नबसवेश्वर ढवण, सहसचिव आबासाहेब घावटे, कोषाध्यक्ष गंगाधर अहिरे, शब्बीर मुलाणी, मुकुंदराज कुलकर्णी, प्रकाश गव्हाणे, डॉ. कृष्णा मस्तुद, डॉ. रविराज फुरडे, दत्ता गोसावी, सुमन चंद्रशेखर, शिवानंद चंद्रशेखर, संतोष पाठक आदी परिश्रम घेत आहेत.