

मोडनिंब : पुढारी वृत्तसेवा माळी समाज प्रबोधिनी व महाराष्ट्र व सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र यांच्यावतीने दिला जाणारा संत सावता महाराज सेवा पुरस्कार अरण येथील संत सावता माळी विद्यालयातील उपक्रमशील सहशिक्षक सतीश घाडगे यांना प्रदान करण्यात आला.
समता भूमी पुणे येथे डॉ. अनिल सावरकर, के.एस.माळी. विकास आण्णा रासकर, दशरथ कुळधरण यांच्या हस्ते समता भूमी पुणे येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी घाडगे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सतीश घाडगे हे संत सावता माळी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय श्रीक्षेत्र अरण येथे 20 वर्षांपासून सहशिक्षक या पदावर कार्यरत. संत सावता माळी सेवाभावी न्यासाचे संस्थापक सहसचिव म्हणून 2016 पासून कामकाज पाहत आहेत. संत सावतामाळी अन्नछत्र मंडळाचे मार्गदर्शक व विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत.
खंडोबा देवस्थान यात्रा पंच कमिटीचे विश्वस्त म्हणून काम पाहतात. हरिभाऊ नाना शिंदे फाउंडेशनचे विश्वस्त म्हणून काम पाहतात. रक्तदान शिबिरे, वधू वर सूचक मंडळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, समतावारी सहभाग, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजक, माळी समाज संघटनासाठी पुढाकार, ओबीसी समाज मेळावा, गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध उपक्रमात घाडगे यांचा सहभाग असतो.