Uddhav Thackeray : ही विराट सभा पाहून पाकिस्तानही सांगेल की शिवसेना कोणाची : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : ही विराट सभा पाहून पाकिस्तानही सांगेल की शिवसेना कोणाची : उद्धव ठाकरे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ही विराट सभा पाहून पाकिस्तानही सांगेल की शिवसेना कोणाची आहे. हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की, एकामागून एक सभांना इतकी गर्दी आहे. तरीही काहींना वाटतं की शिवसेना आपलीच आहे अशा टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. जळगाव येथील पाचोरा येथे झालेल्या सभेत बोलत असताना त्यांनी शिंदे गटासह भाजपचा चांगलाच समाचार घेतला..

शिवसेना आमचीच आहे असं मत व्यक्त करत ते म्हणाले की, आमच्या सभांना इतकी गर्दी होत आहे, मात्र आमच्याकडील मोतीबींदू झालेल्या निवडणूक आयोगाला मात्र हे कळत नाही. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखले नाही. बाप तो बदल देते हे, उसके साथ चुरा भी देते है, असं म्हणत शिंदे गटाचा ठाकरेंनी समाचार घेतला. त्यांनी धनुष्यबाण चोरलं, बाप देखील चोरला. ही गद्दारांची औलाद आपली असू शकत नाही. ४० गेल्यानं आपल्याला फरक पडत नाही. मात्र १ निष्ठावंत गेल्यानं मात्र फरक पडतो. निवडून देणारे आजही आपल्यासोबत असल्याचे प्रतिपादन ठाकरेंनी यावेळी केले.

सभेत घुसणाऱ्या घुशींना बिळातून बाहेर काढा : गुलाबराव पाटील यांच्यावर टीका

आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये, असं थेट आव्हान जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. याचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. "सभेत घुसणाऱ्या घुशी खूप पाहिल्या, या घुशींना बिळातून बाहेर काढा" अशी टीका ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. यांना जसं घोड्यावर बसवलं तसंच खाली उतरविण्याची वेळ आली आहे. आता आलेलं सरकार हे अवकाळी सरकार आहे असं देखील ते म्हणाले.

तुमचं जरी चाललं असेल ओकेमंदी, पण माझ्या कापसाला भाव कधी?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत असताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला. कावितांच्या रुपाने त्यांनी सध्य सरकारची स्थिती मांडली. ते म्हणाले, शेतकऱ्याने त्याच्या व्यथेला शब्दांकन करुन टाहो फोडला तर त्याला अटक कराल. झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आता बांधावरी, तुमचं जरी चाललं असेल ओकेमंदी, पण माझ्या कापसाला भाव कधी? असा सवाल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. भाजपसोबत असे असेपर्यंत देशाचे नुकसानच होणार आहे.

शिंदे गटाने ठाकरे गटावर केलेल्या आरोपांना देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मिंधे म्हणतात आमचं सरकार घेणार नाही तर देणारं आहे, काय दिलं तुम्ही? आम्हाला म्हणतात घरी बसून सरकार चालवलं. पण मी घरी बसून जे केलं ते तुम्ही वणवण फिरुन करु शकत नाही. जनेतेला विचारा की, मी तुम्हाला जवळचा वाटतो की मिंधे जवळचा वाटतो.

पंतप्रधान यांचा मित्र २ नंबरचा श्रीमंत कसा झाला?

आपण सगळ्या थापा ऐकत आलो आणि पुन्हा अब की बार, अब की बार बस झालं आता आपटी बार करा यांना. सत्यपाल मलिक यांनी माहिती सांगितली. पुलवामा हत्याकांडात आपले ४० जवान शहीद झाले. सुरक्षा विभागाने हलगर्जीपणा केला. भ्रष्टाचााराचा खुलासा केला, पण त्यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला. अमित शाह म्हणाले, सत्यपाल मलिक आज बोलले, राज्यपाल असताना का नाही बोलले? तेव्हा सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट सांगितलं की, मी पंतप्रधान मोदी यांना जेव्हा सांगितलं तेव्हा ते रील कार्पेटमध्ये होते. त्यांनी सांगितलं की या विषयी काही बोलले नाहीत. अमित शाह यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावले आहे, तुरुंगात जाता की भाजपात येता? तुमच्यामध्ये आल्यानंतर ते शुद्ध होतील आणि आमच्यात राहिल्यावर भ्रष्ट कसे? मला अमित शहा यांना विचारायचं आहे की, तुम्ही विरोधकांवर कारवाई करता, तुमच्या पक्षात आल्यावर मात्र सौम्यपणा घेता. असा सवाल ठाकरेंनी केला. पंतप्रधान यांचा २ नंबरचा मित्र श्रीमंत कसा झाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयात सध्या निकाल प्रलंबित आहे. हा निकाल आपल्याला न्याय देईल. आपलं सरकार पुन्हा येणार असं प्रतिपादन ठाकरेंनी केलं. मी काँग्रेससोबत गेलो असलो तरी हिंदूत्व अजिबात सोडणार नाही असं देखील ते यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news