आपल्या लेकरांना शिस्त लावायला हवी असं वाटणं साहजिक; पण म्हणजे नेमकं काय करायचं हे काहींच्या लक्षात येत नाही. अशावेळी पुढील कल्पना वापरून पाहता येतील ( Discipline )
आपल्या लेकरांच्या चांगल्या वागण्याचं कौतुक करा.
त्यांचं विशिष्ट वर्तन आवडलं नाही तर त्याची कारणं सांगून ते वर्तन न आवडल्याचं त्याला / तिला स्पष्टपणे सांगा.
शिस्तीच्या बाबतीत जर पालकांपैकी एकाने लेकराला एका पद्धतीने वागवलं आणि दुसर्याने दुसर्या पद्धतीने वागवलं तर समस्या उद्भवू शकते. मूल हे लगेच शिकतं की जर एक पालक नाराज असेल तर दुसरा आपल्याला सांभाळून घेईल, आपली बाजू घेईल. हे टाळायचं, तर दोन्ही पालकांचं वर्तन शिस्तीच्या बाबतीत सारखं हवं.
तुम्ही शिस्त का लावू पाहात आहात, हे आपल्या लेकराला समजावून सांगा. काय करायचं नाही हे सांगण्यापेक्षा काय करायचं आहे हे स्पष्टपणे आणि नेमकेपणाने सांगा.
शिस्त लावण्यासाठी किंवा एखादी समस्या सोडविण्यासाठी माराचा / हिंसेचा कधीही उपयोग होत नाही. कुठल्याही परिस्थितीत हिंसेचा अवलंब करायचा नाही हे मनोमन पक्क करा. ( Discipline )