

पुढारी : Tripura Rath Yatra Accident : त्रिपुरात इस्कॉनकडून आयोजित भगवान जगन्नाथ यांच्या 'उल्टा रथ यात्रा' उत्सवा दरम्यान मोठी दुर्घटना घडली. हायटेन्शन तारच्या संपर्कात आल्याने रथाला आग लागली. या या घटनेत दोन लहान बालकांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 लोक आगीत होरपळले आहेत. घटनेवर प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
पीएमओने पंतप्रधान मोदींचा हवाला देत ट्विट केले की, "उलटा रथयात्रेदरम्यान कुमारघाट येथे झालेला अपघात दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो, जखमींना लवकर बरे होवो. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे. लोक." मदत पुरवत आहे."
त्रिपुरातील उनकोटी जिल्ह्यात इस्कॉनतर्फे कुमारघाट भागात सायंकाळी साडेचारच्या दरम्यान भगवान जगन्नाथ यांच्या 'उलटा रथ यात्रा' उत्सवा दरम्यान अचानक एक रथ हायटेंशन तारच्या संपर्कात आला. ज्यामुळे त्यात आग लागली. लोकांना काही कळण्याआधीच आगीने प्रचंड रौद्र रुप धारण केले होते. यावेळी रथावरील सात जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये दोन बालकांचाही समावेश होता.
या उत्सवा दरम्यान भगवान बलभद्र, देवी सुभद्रा, आणि भगवान जगन्नाथ रथ यात्रेच्या एका आठवड्यानंतर ते आपल्या मुख्य मंदिरात पुन्हा परत येतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा रथ लोखंडाने बनलेला असतो. या रथाला हजारो लोक ओढत होते. त्यावेळी 133 केवी ओवरहेड केबलच्या संपर्कात आला.
या घटनेबाबत मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, कुमारघाट येथे झालेल्या एका भीषण अपघातात 'उलटा रथ' काढताना विजेचा धक्का लागून अनेक भाविकांना प्राण गमवावे लागले आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. शोकाकुल परिवाराप्रती हृदयातून संवेदना. तसेच, जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी कामना करतो. या कठीण काळात राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे."
त्याच प्रमाणे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी रुग्णालयात जखमी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्यासाठी मदत जाहीर केली आहे.
हे ही वाचा :