संकेश्वरजवळ शॉर्टसर्किटमुळे ट्रॅव्हल बस जळून खाक; सुदैवाने ४० जणांचे प्राण वाचले

शॉर्टसर्किटमुळे ट्रॅव्हल बस जळून खाक
शॉर्टसर्किटमुळे ट्रॅव्हल बस जळून खाक
Published on
Updated on

निपाणी ; मधुकर पाटील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वरनजीक सोलापूर गेटजवळ आज (शुक्रवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये प्रवाशांच्या बॅगांसह किंमती साहित्य तसेच संपूर्ण बस जळून खाक झाली. या दुर्घटणेत सुमारे कोटींचे नुकसान झाले. दरम्यान सुदैवाने चालक,क्लीनरसह 40 प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची नोंद संकेश्वर अग्निशमन व पोलिसात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथून शर्मा ट्रॅव्हल्सची खासगी बस बंगळूर येथे जात होती. या बसमधून 38 प्रवासी प्रवास करीत होते. ही बस पहाटेच्या सुमारास संकेश्वर हद्दीतील सोलापूर गेटजवळ आली असता मागील दोन्ही चाके एकमेकांना घर्षण (लायनिंग जाम झाल्याने) शॉर्टकट होऊन बसला मागील बाजूने आग लागली. ही आग इतकी भीषण होती की केवळ पंधरा मिनिटात सदर बसला आगीने वेढले. दरम्यान यावेळी चालक सिद्धाप्पा (वय 38) रा. बेळगाव यांनी प्रसंगावधान राखुन क्लीनरच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले. मात्र, अनेक प्रवाशांच्यासोबत असलेल्या बॅगा व इतर किंमती साहित्य बसमध्येच अडकून पडल्याने ते संपूर्ण जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळतात रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. संकेश्वर पोलिसांसह अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानुसार संकेश्वर अग्निशमन दलाचे निरीक्षक ए. आय. रुद्रगौडर यांनी बंबासह घटनास्‍थळी धाव घेतली. मात्र तत्पूर्वीच सदर बस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने जळून खाक झाली. घटनास्थळी संकेश्वर पोलीस ठाण्याचे सीपीआय एस.एम.औजी यांच्यासह हवालदार राजू कडलस्कर यांनी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा निरीक्षक शशिधर निलगार यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेत बससह किंमती साहित्य खाक झाल्याने सुमारे कोटींचे नुकसान झाल्याची नोंद चालक सिद्धाप्पा यांनी संकेश्वर अग्निशमन विभागासह पोलिसात दिली असून, पुढील तपास सीपीआय औजी हे करीत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news