आजचे राशिभविष्य (दि.८ जुलै २०२३)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

मेष ः दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. रचनात्मक योजना बनवू शकता.

वृषभ ः अशा व्यक्तीचा फोन येऊ शकतो, ज्याच्याशी तुम्ही खूप वेळेपासून बोलण्याची इच्छा बाळगत होते. अनेक जुन्या आठवणी ताज्या होतील.

मिथुन ः अनावश्यक दडपण येईल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर भरघोस नफा होईल. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन हेतूबद्दल शंका घेऊ नका.

कर्क ः कुटुंबासोबत बसून काही महत्त्वाच्या निर्णयाला अंतिम रूप दिले जाऊ शकते. पुढे हा निर्णय लाभदायक सिद्ध होईल. आर्थिक लाभाची शक्यता.

सिंह ः तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी.

कन्या ः तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त केले तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. दिवस आनंदात जाईल.

तूळ ः कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल.

वृश्चिक ः व्यापारातील नफा बर्‍याच व्यापार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद आणू शकतो. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता.

धनु ः कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल.

मकर ः शुभ दिवस आहे. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल. पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात.

कुंभ ः प्रत्येक माणसाचे म्हणणे ऐका. कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. विनाकारण ताणतणाव घेऊ नका. योग्य निर्णय घ्या,

मीन ः आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. पैशाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल.

– ज्यो. मंगेश महाडिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news