लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची : उद्धव ठाकरे

लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची : उद्धव ठाकरे
Published on
Updated on

उमरगा; पुढारी वृत्तसेवा : उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कै शिवाजी मोरे क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित ठाकरे गट शिवसेनेची जनसंवाद सभा पार पडली. या सभेत शिवसेनेचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. आमचे हिंदुत्व चुली पेटविणारे असून भाजपचे हिंदुत्व घरे पेटविणारे आहे. आपला देश हाच माझा धर्म असून देशाची लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. भाजपचा मूडदा पाडून लोकशाही मजबूत करा असा घणाघात ठाकरे यांनी केला. यावेळी शिसेनेचे नेते संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, विरोधी पक्ष नेते रावसाहेब दानवे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,मिलींद नार्वेकर,आमदार कैलास पाटील,सुरेश वाले, बाबा पाटील,अश्लेष मोरे आदींची उपस्थिती होती.

पावणे सात वाजता उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन झाले तेंव्हा शिवसैनिकांनी प्रचंड जयघोष केला. या वेळी  बोलताना ठाकरे म्हणाले की, मी भाजपचे अमित शहा यांनी मला अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं सांगितले होते हे मी आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो पण त्यानीं तो शब्द पाळला नाही म्हणून युती तुटली आणि त्यानीं गदारांना खोके देऊन माझे सरकार पाडले शिवसेना फोडली नाही अजूनही शिवसेना अभेद्य असून भाजपचे पाचशे बावनकुळे आले तरी ती संपणार नाही माझा सामान्य शिवसैनिक आजही शिवसेनेवर जीवापाड प्रेम करतो असे ते म्हणाले या ठिकाणच्या शिवसैनिकांच्या निष्ट्ये बद्धल बोलतांना ते म्हणाले मी शिवसेना प्रमुखासोबत १९९५ साली आलो होता हा किस्सा सांगितला त्या वेळी सभेत साप निघाला होता त्या सापाला आम्ही विष पाजले आणि तो गद्दार निघाला असे ते म्हणाले. आज शिवसेनेसोबत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात जोडला असून त्यानीं मला संविधान वाचविण्याची जबाबदारी दिली आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नव्हतो तर तुमचा कुटूंब प्रमुख होतो आणि आजही आहे. आज जे घराणे शाहिवर बोलत आहेत त्याना भारतीय संस्कृतीचा विसर पडला आहे मातृपितृ संस्कृतीत आपण वाढलो आहोत मला माझ्या घराण्याचा गर्व आहे लोकांच्या हितासाठी माझे वडील आजोबांनी मोलाचे कार्य केले आहे असे ते म्हणाले. भाजपचें हिंदुत्व गोमूत्र धारी असून आमचे हिंदुत्व संकट काळी मदत करणारे आहे. असे ते म्हणाले या वेळी संजय राऊत, सुषमा अंधारे,ओमप्रकाश राजेंनिंबाळकर, आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमास काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,वंचीत आघाडी आदींचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, तालुका शिवसेना प्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, बसवराज वरनाळे, दीपक जवळगे, विजयकुमार नागणे, राजेंद्र सूर्यवंशी सुधाकर पाटील, आदींनी परिश्रम घेतले

नितीनजी भाजपला सोडून द्या आम्ही तुम्हाला निवडणूक आणू

भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव नाही ज्यांनी भाजपा वाढवले त्याना बाजूला सारून गद्दारी करणाऱ्याना तिकिटे दिली जात आहे. असे ते म्हणाले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उमरगा येथील सभेला संबोधित करतांना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news