

डब्लिन : भारत व आयर्लंड यांच्यातील तिसरा व शेवटचा टी-20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सातत्याने संततधार होत असल्याने या लढतीत अगदी नाणेफेकही होऊ शकली नाही. यासह भारताने 3 सामन्यांची ही छोटेखानी मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. कर्णधार जसप्रीत बुमराहने चषक स्वीकारल्यानंतर तो संघातील युवा खेळाडू रिंकू सिंगकडे सुपूर्द केला.