

पुढारी ऑनलाईन ; वंचित बहुजन आघाडी ही मविआचा घटक आहे. वंचितसह शिवसेनेचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे जागावाटपावरून मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत अशी भूमीका ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली. तसेच काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत. राहुल गांधी यांच्या यात्रेने उत्साह निर्माण होईल तसेच त्यांच्या पक्षाला यामुळे ताकद मिळेल असे ते म्हणाले. नितीश कुमार यांच्याबाबत बोलताना ते अनुभवी नेते आहेत. त्यांच्याबाबत सर्वजण सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.
देशात गेल्या १० वर्षात बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबात सरकारनं स्पष्टीकरण द्यावं असं मत ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. देशात उद्योगपतींची कर्जे माफ होतात, मग शेतकऱ्यांची कर्जे का माफ होत नाहीत असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.