नागपूर; पुढारी वृत्तसेवा : घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेत असतात. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, त्या 16 आमदारांनी त्या उपाध्यक्षाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. उपाध्यक्षांना निर्णय घेता येत नसल्याने सर्वोच न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे. निर्णय काय होईल हे आज सांगता येणार नाही. मात्र, कायद्याचा अभ्यास किंवा विश्लेषण करताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की भविष्यात अशा पद्धतीने राज्यात कुठेही सत्ता संघर्षाचा पेच निर्माण होऊ नये, झाल्यास त्याचे निराकरण घटनेनुसार व्हावे, असा न्यायालयाचा दृष्टिकोन असेल असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड उज्जवल निकम यांनी आज (दि. १०) नागपुरात माध्यमांशी बोलताना केले.