

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंटची बेवसीरीज 'द रेल्वे मॅन' आधीच खूप गाजली आहे. जागतिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर भारतातील नंबर १ शो म्हणून ट्रेंडिंग आहे. १८ नोव्हेंबर रोजी प्रीमियर झालेली ४ भागांची ही मिनी-सिरीज चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
संबंधित बातम्या
'द रेल्वे मॅन' बद्दल ज्या अनेक गोष्टी उभ्या राहिल्या आहेत त्यापैकी, एक प्रमुख ठळक बिंदू म्हणजे, मूळ स्कोअर! एक निव्वळ मास्टरस्ट्रोक म्हणून, यशराज फिल्म्सने 'द रेल्वे मॅन'चे स्कोअर तयार करण्यासाठी, जागतिक स्तरावर प्रशंसित मालिका चेरनोबिल, जोकर अँड वुमन टॉकिंग फेमचे दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते सॅम स्लेटरला संगीतकार म्हणून निवडले आहे.
रेल्वे मॅन ही विरता, आशा आणि मानवतेची एक थरारक कथा आहे. नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंट यांच्यातील भागीदारीतील हा पहिला प्रोजेक्ट आहे. रेल्वे मॅन ही भोपाळमधील भारतीय रेल्वेच्या कर्मचार्यांनी दाखवलेल्या विलक्षण वीरतेची कहाणी आहे. हवेतील अदृश्य शत्रूशी मुकाबला करत गॅस गळतीच्या भयंकर रात्री आपल्या सहकारी नागरिकांना वाचवण्यासाठी या व्यक्ती सर्व अडचणीविरुद्ध उभ्या होत्या असे वेबसीरीजमध्ये दाखविले आहे.
सत्य कथांनी प्रेरित, ही आकर्षक मालिका मानवतेच्या अदम्य साहस यांचा उत्सव आहे. यात आर माधवन, के. के. मेनन, दिव्येन्दु, बाबिल खान, जूही चावला, मंदिरा बेदी यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे.