

पुढारी ऑनलाईन डेस्क : युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१) मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमापासून दुपारी ४ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल परब, सुनिल प्रभू आदीसह ठाकरे गटाचे नेते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात हा मोर्चा (Thackeray Group Morcha) काढण्यात आला आहे. यावेळी महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे.
मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत आहेत. रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, खडी घोटाळा, असे आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चा काढून राज्य सरकारवर (Thackeray Group Morcha) हल्लाबोल करणार आहे.
हेही वाचा