Google Pixle 8 Pro ची धमाकेदार एन्ट्री; जाणून घ्या फिचर

Google Pixle 8 Pro ची धमाकेदार एन्ट्री; जाणून घ्या फिचर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Google ने 'मेड बाय गुगल लॉन्च इव्हेंट'मध्ये त्यांच्या Pixel Watch 2 सह, कंपनीच्या बहुप्रतिक्षित Google Pixel 8 सिरीज लॉन्च केला. टेक्नॉलॉजीतील या दिग्गज कंपनीच्या वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर हा लॉन्चिंग सोहळा थेट प्रसारित केलेला होता.

पिक्सेल 8 आणि 8 प्रो हे या Google च्या लॉन्चिंग सोहळ्यातील मुख्य आकर्षण होते. हा संपूर्ण लॉन्चिंग कार्यक्रम या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन्समुळे चर्चेत होता. हे दोन्ही मॉडेल्स Google च्या इन-हाउस Tensor G3 चिप आणि आजपर्यंतचे सर्वात प्रगत पिक्सेल कॅमेरे असतील अशी माहिती यावेळी देण्यात आली. Pixel 8 Pro हे सध्या सर्वात चर्चेतील मॉडेल आहे.

Google Pixel 8 Series ची स्टोरेज क्षमता

Pixel 8 Pro मध्ये 12GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळेल. Pixel 8 मध्ये 8GB LPDDR5X RAM आणि 128GB UFS 3.1 स्टोरेज आहे.

Google Pixel 8 Series च्या कॅमेरामधील नवीन फिचर

Pixel 8 च्या सीरीजमध्ये 50MP Samsung ISOCELL GN2 सेन्सर असतील, जे 35% जास्त प्रकाश कॅप्चर करतात, यामुळे कमी-प्रकाशातही अधिक चांगल्या दर्जाचे फोटो यातून मिळतील. Pixel 8 Pro यामध्ये merrier कॅमेरे (अधिक थर्मामीटर सेन्सर), एक मोठा डिस्प्ले आहे. विशेषत: नवीन कॅमेरा सेन्सर, जो उच्च-रिझोल्यूशन अल्ट्रावाइड सेन्सरसह सुसज्ज असेल अशी माहिती या लॉन्चिंगवेळी देण्यात आली.

Google Pixel 8 Series चा डिस्प्ले कसा असेल?

Google Pixel 8 सीरीजच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6.17-इंच FHD AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशन मिळू शकते. याशिवाय, Pixel 8 Pro मध्ये 6.7 इंच OLED डिस्प्ले पॅनल, 120Hz रिफ्रेश रेट, 3120×1440 पिक्सेल रिझोल्यूशन मिळू शकते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news