

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची कंन्या बांसुरी स्वराज यांनी आपल्या आईची बऱ्याच वर्षापासूनची एक परंपरा कायम ठेवली. बांसुरी स्वराज यांनी सोमवारी भाजपचे वरिष्ठ नेते एल के अडवाणी यांची भेट घेतली. बांसुरी यांनी अडवणी यांना ९४ व्या वाढ दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्यासोबत चॉकलेट केकही आणला होता.
बांसुरी यांनी ट्विट करुन या भेटीची माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी एल के अडवाणी यांच्याबरोबरचा आपला फोट पोस्ट करत त्याला 'माझ्याकडून आदरणीय अडवाणी जींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करते.' असे कॅप्शन दिले.
सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी यांनी सांगितले की, त्यांनी आपली आई सुषमा स्वराज यांची अडवाणीजींच्या वाढदिवसादिवशी चॉकलेट केक घेऊन जाण्याची गोड परंपरा कायम ठेवली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या सोबत फुलांचा गुच्छ आणला होता. त्यांनी अडवाणींच्या केक कटिंग कार्यक्रमालाही उपस्थिती दर्शवली होती. याबाबतचा व्हिडिओ भाजपने शेअर केला.