Suruchi Adarkar : का रे दुरावा फेम सुरुची आडारकर अडकली विवाह बंधनात; कोण आहे तिचा पती?

Suruchi Adarkar
Suruchi Adarkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : का रे दुरावा फेम आणि मराठी अभिनेत्री सुरुची आडारकर ( Suruchi Adarkar ) नुकतेच गुपचूप पद्धतीने लग्नबंधनात अडकली आहे. सुरुचीने अभिनेता पियुष रानडेसोबत लग्न गाठ बांधली आहे. पियुष हा तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. या विवाहाचे काही फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री सुरूची अडारकर ( Suruchi Adarkar ) आणि पियुष रानडे यांनी आपआपल्या इंन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत खास करून पियुषने सुरूची हिच्या गळ्यात मंगळसुत्र घालताना दिसत आहे. या विवाहासाठी सुरूचीने येलो कलरच्या साडीवर क्रिम कलरचे ब्लॉउज परिधान केले. तर पियुषने क्रिम कलरची शेरवानी परिधान केली आहे. लग्नात दोघजण खूपच ग्लॅमरस आणि क्यूट दिसत होते. शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत सुरूची आणि पियुष एकमेंकाच्या जवळ असून ती पियुषकडे टक लावून पाहताना दिसतेय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'आनंदी दिवस' असे लिहिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह अनेक मराठी कलाकरांनी त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. दुसरीकडे गुपचूप लग्न केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कोण आहे पियुष रानडे?

पियुष रानडेचा जन्म २८ मार्च, १९८३ रोजी महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यात झाला आहे. पियुष हा एक उत्तम अभिनेता असून त्याने अनेक हिंदी- मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकात काम केलं आहे. पियुषने 'लज्जा', 'एकच या जन्मी जनु', 'अस्मिता', 'गुंडा पुरुष देव', 'अंजली', 'साथ दे तू मला' आणि 'पिंकीचा विजय असो' या मालिकेत अभिनय साकारलाय. याशिवाय तो 'काव्यांजली' या मालिकेत दिसणार आहे.

पियुष रानडेचे सुरूचीसोबतचे हे तिसरे लग्न आहे. पहिल्यांदा त्याने अभिनेत्री शाल्मली टोळयेसोबत लग्नगाठ बांधली. हे लग्न फार काळ टिकलं नाही. यामुळे त्याने १ फेब्रुवारी २०१६ रोजी अभिनेत्री मयुरी वाघसोबत दुसरे लग्न केलं होतं. मात्र, काही कारणास्तव हेही लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर आता अभिनेत्री सुरुची आडारकरसोबत लग्नगाठ बांधली.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सुरूचीला 'का रे दुरावा' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती 'अंजली' आणि 'एक घर मंतरलेलं' मध्ये दिसली. याशिवाय सुरूची 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात आणि छोट्या पडद्यावरील 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' या मालिकेत दिसली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news