

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील बाजौर जिल्ह्यात आज ( दि.३०) एका राजकीय पक्षाच्या बैठकीवेळी बॉम्बस्फोट झाला. या घटनेत ३५ जण ठार तर २०० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. (Pakistan blast)
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात एका राजकीय पक्षाच्या बैठकीदरम्यान बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ३५ जण ठार तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. (Pakistan blast)
बाजौर जिल्ह्यात जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) ने बैठक आयोजित केली होती. बॉम्बस्फोटात खारमधील JUI-F चे प्रमुख नेते मौलाना झियाउल्लाह जान यांचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती बाजौर जिल्हा आपत्कालीन अधिकारी साद खान यांनी पाकिस्तानमधील दैनिक 'डॉन'ला दिली. जखमींना पेशावर आणि टाइमरगेरा येथील जवळच्या रुग्णालयात दाखल केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
रविवारी झालेल्या या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता येथील प्रशासनाने वर्तविली आहे. आतापर्यंत ३५ जण मृत्यू झाल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. येथील प्रशासनाकडून या घटनेतील जखमी लोकांसाठी बचावकार्य सुरु आहे. तसेच स्फोट झालेल्या ठिकाणापासून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे.
हेही वाचा