‘शुगर लेव्हल’ राहिल संतुलित, ब्रेकफास्ट करताना ‘या’ चुका टाळा

‘शुगर लेव्हल’ राहिल संतुलित, ब्रेकफास्ट करताना ‘या’ चुका टाळा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रक्तातील 'श़़ुगर लेव्हल' (साखरेची पातळी ) स्थिर ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. रक्तातील 'श़़ुगर लेव्हल' संतुलित असेल तर भूकेची तीव्रता कमी राहते तसेच वजनही आटोक्यात राहते. मात्र आपल्या जीवनशैलीतील नकळत होणार्‍या चुकांचा परिणाम आरोग्‍यावर होतो. आपण ब्रेकफास्‍टने दिवसाची सुरुवात करतो तेथेच काही चुका होतात. या चुकां कोणत्‍या आणि त्‍या टाळण्‍यासाठी कोणती खबरदारी घ्‍यावी यासंदर्भात न्‍यूयॉर्कमधील आहारतज्‍ज्ञ मेलिसा रिफकिन या चार चुका टाळण्‍याचे आवाहन करतात. पाहूया काय आहेत या चार चुका…

1) आहारात कमी फायबरचा समावेश…

मेलिसा म्‍हणतात, निरोगी आरोग्‍यासाठी आपण आपल्‍या आहारात फायबरचा ( तंतूमय पदार्थ ) समावेश करणे अत्‍यावश्‍यक आहे. फायबर असणार्‍या पदार्थांच्‍या सेवनामुळे आपली पचनशक्‍ती सुधारते. त्‍याचबरोबर रक्‍तातील कोलेस्‍टेरॉलही नियंत्रीत राहते. तसेच रक्‍तातीतल कार्बोहायड्रेट्‍सचे प्रमाणही कमी करते. जेव्‍हा तुमच्‍या ब्रेकफास्‍टमध्‍ये कमी फायबरच्‍या पदार्थांचा समावेश करतो तेव्‍हा कार्बोहायड्रेटसच्‍या जलद वाढीमुळे रक्‍ताील साखर वाढू शकते किंवा कमीही होऊ शकते. याचा परिणाम तुमच्‍या भूकेवरही होता. त्‍यामुळे तुम्‍ही तुमच्‍या ब्रेकफास्‍टमध्‍ये ५ ग्रॅम कर्बोदकांमागे १ ग्रॅम फायबरचा समावेश करावा. तुमच्‍या ब्रेकफास्‍टमध्‍ये फळांचा समावेश करा. तसेच ओटचे जाडे भरडे पीठ, उच्‍च फायबर असणारी तृणधान्‍ये आणि हिरव्‍या भाज्‍या सारखे फायबरयुक्‍त पदार्थांचा समावेश करावा. ब्रेकफास्‍टमध्‍ये फायबर कमी असणार्‍या पदार्थांचे सेवन करण्‍याची चूक टाळावी.

२) प्रोटीनयुक्‍त पदार्थांचा अभाव

ब्रेकफास्‍टमध्‍ये झटपट बनविणार्‍या पदार्थांचाच बहुतांशवेळा असतो. काही जण ब्रेकफास्‍ट म्‍हणून एखादे अर्धे फळ किंवा चहा किंवा कॉफी घेतात. ब्रेकफास्‍ट घेताना प्रोटीनयुक्‍त पदार्थांचा अभाव असणे ही चूक ठरते. ब्रेकफास्‍टमध्‍ये प्रथिनांचे प्रमाण वाढविण्‍यासाठी काही बदल करावे. प्रोटीनयुक्‍त पदार्थांचा अभाव असणारे पदार्थ टाळावेत.

३) कर्बोदक असणार्‍या पदार्थांचा समावेश

कोणत्‍याही आहारात कर्बोदकचे प्रमाण कमीच हवे. कर्बोदके म्‍हणजे कार्बोहाइड्रेट ते शरीरासाठी आवश्‍यक असले तरी त्‍याचा आहारातील समावेश योग्‍य प्रकारे न झाल्‍याचे शरीरातील मेदाचे प्रमाण वाढते. तसेच शरीरातील कॅलरी वाढल्‍यामुळे लठ्‍ठपणा वाढण्‍याची शक्‍यता असते. ब्रेकफास्‍टमध्‍ये कर्बोदकयुक्‍त पदार्थ असणे ही चूक ठरते. असे पदार्थ टाळा. त्‍यामुळे रक्‍तातील साखरेचे प्रमाण कमी होण्‍यास मदत होते. तसेच तुमचे दुपारचे जेवणाचे प्रमाणही कमी होते. यामुळे तुमचे वजन आटोक्‍यात राहण्‍यास मदत होते. उदा कमी मेद असलेले दूध घेतल्‍याने प्रथिने मिळतात, त्‍यात कर्बोदक कमी प्रमाणात असतात. तसेच तुम्‍ही सकाळी बटाटे सेवन टाळून कमी गोड असणार्‍या फळांचा समावेश ब्रेकफास्‍टमध्‍ये करु शकता.

४) ब्रेकफास्‍ट टाळणे

ब्रेकफास्‍ट टाळणे हे आरोग्‍यासाठी हानीकारण ठरते. तसेच हे टाईप २ च्‍या मधुमेहाचीही जोखीमही वाढवते. तुम्‍ही सलग काही तास उपाशी राहणे आणि ब्रेकफास्‍ट टाळणे यामुळे तुमच्‍या रक्‍तातील साखरेची पातळी कमी होण्‍याची शक्‍यता असते. मात्र हा बदल तत्‍काळ लक्षात येत नाही. त्‍यामुळे अनेक जण ब्रेकफास्‍टला टाळला तरी त्‍यांच्‍या आरोग्‍यावर तत्‍काळ परिणाम होत नाही. मात्र यामुळे हायपोग्‍लाइसेमियाची लक्षणे दिसण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामध्‍ये ह्‍दयाचे ठोके वाढणे. अंग थरथर कापणे, घाम येणे, चिडचिड होणे आणि चक्‍कर येणे अशा प्रकराचे शारीरिक त्रास होण्‍याचा धोका असतो. त्‍यामुळे मधुमेहग्रस्‍तांना नाश्‍ता करु नका, असे डॉक्‍टर कधीच सांगत नाहीत. उलट ब्रेकफास्‍ट हा अत्‍यावश्‍यक आहे असेच सांगतात. मधुमेहाच्‍या खराब ग्‍लायसेमिक नियंत्रणामुळे इतर अवयक आणि ऊतींच्या बिघाड व्यतिरिक्त ह्‍दयविकार, मज्‍जातंतू आणि मूत्रपिंडाचोही नुकसान होण्‍याचा धोका वाढतो, त्‍यामुळे तुम्‍ही ब्रेकफास्‍ट टाळण्‍याची चूक कधीच करु नका.

रक्तातील 'श़़ुगर लेव्हल' (साखरेची पातळी ) स्थिर ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असल्‍याने आहारतज्‍ज्ञ मेलिसा रिफकिन यांनी ज्‍या चुका टाळायला सांगितल्‍या आहेत याचे पालन झाले तर निश्‍चितच सकाळच्‍या उत्तम न्‍याहरीने तुमच्‍या दिवसाचीही सुरुवात स्‍फूर्तीदायक ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news