राहुल गांधी यांनl जनताच फ्लाईंग… देईल : सुधीर मुनगंटीवार
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचे एकंदर कृत्य म्हणजे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून यावेत, यासाठी केलेली अप्रत्यक्ष मदतच आहे असे वाटते. संसदेत अपमानजनक व्यवहार कुठल्याही खासदार यांच्याकडून अपेक्षित नाही, खासकरून असा व्यक्ती ज्याला पंतप्रधान व्हायचे आहे, असे कृत्य करून जगासमोर देशाचा गौरव कमी करण्याचे काम करत असेल तर अशा कृतीला माफी नाही. जनता सुज्ञ आहे, आता त्यांना निवडणुकीत जनताच फ्लाईंग… जागा दाखवेल असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
आज (दि. १०) नागपुरात माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आमचे सरकार आल्यापासून सरकार पडेल, असे स्वप्न विरोधकांना, काँग्रेस नेत्यांना पडत असतात. युती भाजपकडून तुटलीच नाही, उद्धव ठाकरे यांनीच युतीत जायचे नाही असे ठरवलं होतं. आमचे निरीक्षक, जेष्ठ अनुभवी नेते आले, असताना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना पाठवण्यात आले. तेव्हाच आमच्या लक्षात आलं, त्यांना युती करायचीच नाही. तेव्हा जूने सर्व फुटेज काढा, किती वाजता युती तुटली त्यांच्या तीन दिवस अगोदर काय झालं ते पाहा असे देखील मुनगंटीवार म्हणाले. अपशब्द काढणारा कोणत्याही पक्षाचा नेता असो की अजून कोणी जी कारवाई व्हायची ती होईलच असे अश्वासन मुनगंटीवार यांनी दिले.
दरम्यान, अमित शाह यांचे कलावती संदर्भात वक्तव्य याकडे लक्ष वेधले असता, मला माहिती नाही. कलावती सारख्या हजारो महिलांच्या आयुष्यातील अंधार भाजपने दूर केला त्या संदर्भाने अमित शाह बोलले असतील असा बचावात्मक पवित्रा सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.
हेही वाचा
- Parliament No confidence Motion: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभसंकेत! पीएम मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर
- अधीर रंजन चौधरी यांच्या विधानांवरुन प्रचंड गदारोळ; वादग्रस्त विधान कामकाजातून वगळले
- Stock Market Closing Bell | RBI च्या निर्णयामुळे शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स ३०७ अंकांनी घसरून बंद, बँकिंगला मोठा फटका

