

पॅरालम्पिकमध्ये तीन वेळचा पदक विजेता भाला फेक खेळाडू देवेंद्र झाझरिया, माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि माजी जागतिक चॅम्पियन बॉक्सर एल सरिता देवी यांना यावर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या निवड समितीमध्ये सहभागी सहभागी करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती मुकुंदकम शर्मा निवड समितीचे अध्यक्ष असतील ज्यामध्ये माजी नेमबाज अंजली भागवत आणि महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांचा देखील समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
देवेंद्र झाझरिया नुकत्याच पार पडलेल्या टोकियो पॅरालम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्यापूर्वी त्याने 2004 आणि 2016 मध्ये सुवर्णपदक मिळवले. समिती येणाऱ्या काही दिवसात बैठक करून विजेत्यांबाबत निर्णय घेणार आहे. ऑलिंपिक आणि पॅरालम्पिकमधील भारताच्या कामगिरीसाठी सरकारने प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यावेळी पुरस्काराला उशिर झाला. भारताने दोन्ही खेळात आजवरची आपली सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने ऑलिंपिकमध्ये सात पदक मिळवले तर, पॅरालम्पिकमध्ये पाच सुवर्णपदकासह 19 पदक पटकावले. भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवले.
क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार असलेला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आता ध्यानचंद पुरस्काराच्या नावाने ओळखला जाईल. खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देखील देण्यात येतात. खेल रत्न पुरस्कार विजेत्याला 25 लाख रुपये पुरस्काररूपी देण्यात येतात.तर, अर्जुन पुरस्कार विजेत्याला 15 लाख बक्षीस म्हणून देण्यात येतात. प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येतात. वार्षिक पुरस्कारांमध्ये जीवन गौरव पुरस्कार (लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार आणि मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी देखील देण्यात येते. निवड समितीत हॉकी प्रशिक्षक बलदेव सिंह, भारतीय क्रीडा प्राधिकरणचे महानिदेशक संदीप प्रधान आणि वरिष्ठ पत्रकार विजय लोकपल्ली व विक्रांत गुप्ता यांचा देखील समावेश आहे.