मुंबई : पुढारी ऑनलाईन
भारतीय संघातील स्पिनर आणि प्रसिद्ध गोलंदाज यजुवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. आता धनश्रीची पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरसोबत नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर धमाल केली आहे. सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
इंडियन प्रीमियर लीगमधील भारतीय क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटलचा कर्णधार श्रेयस अय्यर याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) चा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मासोबत नाचताना दिसत आहे. डान्समध्ये धनश्रीनं केलेल्या स्टेप्सची तर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पण त्याचबरोबर श्रेयस अय्यरही या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये श्रेयस आणि धनश्री एकमेकांशी स्टेप मॅच करताना दिसत आहेत. श्रेयसचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्या व्हिडिओला ६ लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत, तर पाच हजाराहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.
धनश्री आणि श्रेयस अय्यरच्या धमाल डान्सनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. धनश्रीचा स्वत:चा युट्यूब चॅनल आहे. तिच्या युट्यूब चॅनलवर १५ लाखहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत.