महिला T-20 विश्वचषकातील खेळाडूंसाठी AI टूल लाँच, जाणून घ्या कारण

शारजाहमध्‍ये आजपासून रंगणार T-20 विश्वचषक स्‍पर्धेचा थरार
women's t20 world cup 2024
महिला T-20 विश्वचषक स्‍पर्धेचा थरार आजपासून (दि. ३ ऑक्‍टोबर) शारजाह येथे रंगणार आहे. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईनक डेस्‍क : महिला T-20 विश्वचषक स्‍पर्धेचा थरार आजपासून (दि. ३ ऑक्‍टोबर) शारजाह येथे रंगणार आहे. २० ऑक्‍टोबरपर्यंत चालणार्‍या या बहुचर्चित स्‍पर्धेत यंदा प्रथमच आर्टिफिशअल इंटेलिजन्समुळे (AI) टूलचा वापर होणार आहे. ( women's t20 world cup 2024 ) जाणून घेवूया आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतलेल्‍या निर्णयाविषयी..

T-20 विश्‍वचषकात AI टूल काय काम करणार?

सर्व खेळाडूंना सुरक्षित आणि सर्वसमावेश ऑनलाईन वातावरण तयार करण्‍यासाठी 'सोशल मीडिया मॉडरेशन' टूल (संगणक सॉफ्टवेअरचा एक भाग) सादर केला आहे. सोशल मीडियावरील द्वेषयुक्त , आक्षेपार्ह आणि अत्‍यंत बदनामीकारक संवाद ओळखण्यासाठी त्‍याचबरोबर अशी सामग्री लपवण्यासाठी या AI टूलची मदत घेतली जणार आहे. सुमारे 60 खेळाडूंनी या टूलसाठी आधीच साइन अप केले आहे. या खेळाडूंसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येणार्‍या सर्वच प्रकारच्‍या टिप्पण्यांचे निरीक्षण करेल आणि नियंत्रित होणार असल्‍याने खेळाडूंच्‍या मानसिक आरोग्‍यावर याचा सकारात्‍मक परिणाम होणार आहे.

आयसीसीचे AI टूल नेमकं काय करेल?

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने सोशल मीडियावरील द्वेषयुक्त, आक्षेपार्ह आणि अत्‍यंत बदनामीकारक टिप्पणी रोखण्‍यासाठी हा उपकम अत्‍यंत महत्त्‍वपूर्ण भूमिका बजावेल. क्रिकेट चाहत्‍यांमध्‍ये निरोगी परस्परसंवादांना प्रोत्साहन देणे हाही याचा उद्‍देश आहे. हा सोशल मीडिया मॉडरेशन प्रोग्राम अंमलात आणण्यासाठी, ICC ने GoBubble सह भागीदारी केली आहे. ICC च्या अधिकृत Facebook, Instagram आणि YouTube चॅनेलवर तसेच सेवेत निवड करणाऱ्या सहभागी खेळाडूंच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टिप्पण्यांचे निरीक्षण आणि नियंत्रण करणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञान विशेषत: द्वेषयुक्त, मानसिक छळवणूक करणार्‍या टिप्पण्या ओळखण्यासाठी आणि लपवण्यासाठी डिझाइन केले आहे. स्‍पर्धेत सहभागी खेळाडू या सेवेचा वापर करणे निवडू शकतात. यामुळे त्यांच्या सोशल मीडिया फीडमधून आपोआप द्वेषयुक्त आणि खेळाडूंना मानसिकदृष्‍टया हानिकारक असणार्‍या टिप्पण्या लपवेल.

सकारात्मक आणि सर्वसमावेशक वातावरणासाठी

आयसीसीचे डिजिटल प्रमुख फिन ब्रॅडशॉ यांनी या उपक्रमाबाबत सांगितले की, "आम्ही आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील सर्व सहभागी आणि चाहत्यांसाठी सकारात्मक आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी समर्पित आहोत. खेळाडू आणि संघ आमचा नवीन उपक्रम स्वीकारतात."

आक्षेपार्ह टिप्पण्यापासून खेळाडूंचे होणार संरक्षण

या उपक्रमाबाबत बोलताना दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू सिनालो जाफ्ता म्‍हणाले की, "यामुळे आता सोशल मीडियावरील आक्षेपार्ह आणि अत्‍यंत बदनामीकारक टिप्‍पण्‍यापासून खेळाडूंचे संरक्षण होईल. कारण अशा टिप्‍पण्‍यामुळे खेळाडूंचे मानसिक खच्‍चीकरण होते. विशेषत: विश्वचषक स्‍पर्धेत याचा मानसिकतेवर नकारात्‍मक परिणाम होतो. तुमचा पराभव झाल्‍यानंतर तुम्‍ही तुमचा स्‍मार्टफोनवरील नकारात्‍मक कंमेट पाहणे यापेक्षा वाईट दुसरे काहीच असत नाही. तुम्ही स्वत:ला कोणत्या बाजूने पाहत आहात याची पर्वा न करता, तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नेहमीच काही निंदनीय टिप्पणी असते. आता नवीन AI टूलमुळे यापासून खेळाडूंचे सरक्षण होणार आहे."

T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत सहभागी होणार १० संघ

महिला टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धा आजपासून शारहजाह येथे सुरु होत असून, अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी दुबई येथे होणार आहे. यंदा या स्‍पर्धेत एकूण १० संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे.

भारत आणि ऑस्‍ट्रेलिया एकाच गटात

भारतीय संघ शुक्रवार, ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध या स्‍पर्धेतील पहिला सामना खेळले. 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारताला गतविजेत्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसह अ गटात स्थान देण्यात आले आहे.तर, ब गटात वेस्ट इंडिज, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news